जळगाव, प्रतिनिधी । शहरातील डॉ, अविनाश आचार्य विद्यालयात ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली .
डॉ, अविनाश आचार्य विद्यालयातील इ १ ली २ री च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी तुकाराम व कुंभार यांच्या गोष्टीचे व्हिडिओ मुलांना पाठवले. विद्यार्थ्यांनी ही या गोष्टीतुन जीवनानुभव व बोध घेतला तसेच इ ३ री ४ थीसाठी तुकारामांचे अभंग व विविध भक्ती गीत शिक्षकांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी ही ।करी टाळी बोला मुखे नाम।या अभंगातुन घरी विठ्ठलाचा गजर करत देवाची आराधना केली. ।देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवलइ ।या गीतातून मुलांनी पांडुरंगाचे नामस्मरण केले. यावेळी शिक्षकांनी शाळेत अंतर ठेवून पावली करत ,फुगडी घालून वारीचा अनुभव घेतला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी व शिक्षकांची उपस्थिती होती.
https://www.facebook.com/watch/?v=963068654153634