जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगरातील समृद्धी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून नोकरदाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेचार वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी, जयवंतराव भगवान पाटील (वय-४३) रा समृद्धी अपार्टमेंट, शिवाजीनगर जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी मालकीची दुचाकी (एमएच १९ बीएल ३४४३) पार्कींगला लावलेली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही मिळाली नाही. बुधवार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर हे करीत आहे.