जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने दुचाकीवर येवून इलेक्ट्रिक खांब्याला आदळल्याने तरूणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शनिवारी १७ जुलै रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल सिध्दार्थ सोनवणे (वय-२३) रा. फुफनगरी ता. जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहूल सोनवणे हा वडील, मोठा भाऊ आणि बहिण यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. राहूल हा मंगळवारी ५ जुलै रोजी कानळदा येथे कामावर गेला होता. काम आटोपून दुचाकी (एमएच १९ डीएल ४०४६) ने घरी परतत असतांना सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी समोरील इलेक्ट्रीक पोलवर आदळली. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरीन नागरीकांनी धाव घेवून त्याला खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रूग्णालयात नेत असतांना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर ११ दिवसानंतर अपघातात झालेल्या मृत्यूच्या कारणासाठी स्वत: मयत राहूल सोनवणे हा जबाबदार असल्याने याबाबत शनिवार १६ जुलै रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ संजय भालेराव करीत आहे.