अपघातात ठार झालेल्या अनोळखी तरूणाचे ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । रविवारी सकाळी साडे सहा वाजता स्वत: हून बससमोर झोकून देत अनोळखी तरुणाने आत्महत्या केली होती. बसचालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र अनोळखी मयताची ओळख पटली नसून ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव डेपोतील जळगाव-श्रीगोंदा जाणारी बस क्रमांक (एमएच ११ बीएल ९३८५) ही १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव औरंगाबाद रोडवर रेमंड चौफुलीवरून जात असतांना स्वत: हून बससमोर झोकून देत अनोळखी तरुणाने आत्महत्या केली होती. दरम्यान, घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तातडीने मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल आहे. एस.टी.बस चालक विशाल गौतम जोगदंड (३४ रा. अनगरे, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध अनोळखी तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मृतदेह जिल्हा शासकिय महाविद्यालयात दाखल असून ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी केले आहे.

Protected Content