जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या २४ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान आज खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे.
योगेश प्रकाश जावरे वय २४ रा. तिवारीनगर, संभाजीनगर या सिव्हिल इंजिनीअर असे तरूणाचे नाव आहे. योगेश हा सिव्हिल इंजिनिअर होता. १३ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खासगी काम आटोपुन दुचाकीने (एम.एच.१९ ४०५०) योगेश घराकडे परतत असतांना मोहाडी रस्तावरील नयनतारा गेस्ट हाऊससमोर अचानकपणे चुकीच्या बाजूने वाहन आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरुन अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यावर त्याच्या मित्रांसह कुटुंबियांनी तातडीने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मेंदुला जबर दुखापत असल्याने अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर योगेशची आई बहीण भावासह कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दुपारी शनिवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले. अपघाताच्या रुपाने योगेशवर अचानकपणे काळाने झडप घातल्याने तिवारीनगरसह मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.