…अन्यथा दहा तारखेनंतर आम्ही लोकडाऊन पाळणार नाही : प्रकाश आंबेडकर

पुणे (वृत्तसंस्था) सन २०१९ च्या वर्षभरात जेवढी माणसं दगावली तेवढीच २०२० च्या कोरोना काळातल्या तीन महिन्यात माणसे दगावली आहेत. त्यामुळे शासनाने कोरोनातून बाहेर पडावे आणि सर्व व्यवहार सुरू करावेत…अन्यथा दहा तारखेनंतर आम्ही लोकडाऊन पाळणार नाही, अशा शब्दात बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

 

 

बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुण्यात आले होते . त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर पुढे म्हणाले की, कोरोना काळात पंतप्रधान कार्यालयापासून ते जिल्हा पातळीवर चालढकल करणे सुरू आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत.सरकारने कोविड कोविड करणं थांबवावे. आणि फक्त मोबाईलच्या कॉलरट्यूनवर देशात अनलॉक आहे म्हणून सांगू नका, प्रत्यक्षात ते लागू करावे. अन्यथा १० तारखेनंतर वंचित बहुजन आघाडी राज्यसरकार विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे..शासन स्वतःहून निर्णय का घेत नाही..सर्व निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडले आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने एक वेळापत्रक ठरवून द्यावे की या दिवशी सर्व व्यवहार सुरू होतील, असेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

Protected Content