जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगराच्या गेटजवळ अंदाजे ३२ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी १५ मे रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव एमआयडीसी परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरातील गेटजवळ शनिवारी १४ मे रोजी सकाळी ८ वाजता अंदाजे ३२ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. येथील स्थानिक नागरीकांनी यासंदर्भात एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता आच्छा यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.