जळगाव प्रतिनिधी । जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्यावतीने उपलब्ध अनुदान अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत व्यायामशाळा विकास अनुदान सन 2020-21 साठी अनुदान उपलब्ध करुण देण्यात येणार असल्याने क्रीडांगण विकास अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय/संस्था संचलित अनुदानीत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये/ वसतीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने, समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. अशा संस्था तसेच ग्राम पंचायत, नगरपालीका, महानगरपालीका इत्यादींना त्यांच्या क्षेत्रातील अनुसुचित जाती वस्ती, वाडी या ठिकाणची लोकसंख्या कमीत कमी 500 अथवा त्याठिकाणी अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल. त्यासाठी ज्या अनुदानीत शाळा/महाविद्यालय/वस्तीगृहे यांच्याकडे शासकीय नियमानुसार 1 हजार स्वेअर फुट जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतात.
व्यायामशाळा विकास योजने अंतर्गत संस्था/शाळेच्या नावे 1 हजार स्वेअर जागा व सातबारा उतारा किंवा दुय्यम निबंधक विभाग यांच्याकडे नोंदणीकृत 30 वर्षाच्या कराराने असलेली जागा आहे. तसेच कमीत कमी 500 लोकसंख्या असलेल्या अनुसुचित जाती वाडी याकरीता प्रस्ताव दाखला करण्यास पात्र असतील. सदर योजने अंतर्गत व्यायामशाळा बांधकामाकरीता रक्कम रु. 7 लक्ष किंवा अंदाजपत्रकीय रक्कमेच्या अनुषंगाने अनुदानांपैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येईल. त्यानंतर व्यायामशाळा साहित्य याकरीता रुपये 7 लक्ष किंवा अंदाजपत्रकीय रक्कम यापैकी कमी असेलेले अनुदान देण्यात येईल. व्यायामशाळा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करतांना शासन निर्णयानुसार 500 स्वेअर फुट हॉल, पुरुष/महिला चेजींग रुम, टॉयलेट ब्लॉक व कार्यालय इ. बाबी घेणे आवश्यक राहिल.
सदर अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2020-21 या वर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असून सदर योजनेचा लाभ/फायदा घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थीनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे दिनांक 31 डिसेंबर, 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव ऑनलाईनव्दारे jalgaonsports.in या वेबसाईटवर अपलोड करावा. अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत. असे आवाहन मिलींद दिक्षीत, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.