अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांचा प्राणघातक हल्ला

 

 

यवतमाळ : वृत्तसंस्था । यवतमाळच्या वाळू तस्करांनि अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केलाय. तहसीलदार आणि तलाठ्यांवर वाळूची तस्करी करणाऱ्या गुंडांनी हल्ला केल्याचं समोर आलंय.

उमरखेड शहरातील ढाणकी रोडवरील गो. सी. गावंडे कॉलेजजवळ उमरखेड तहसिल चे नायब तहसिलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर अज्ञात रेती तस्करांनी हल्ला केलाय. या हल्यात नायब तहसीलदार वैभव पवार यांना पोटावर चाकूचे वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. तर तलाठी गजानन सुरोसे यांनाही दुखापत झाली आहे.

वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने नायब तहसीलदार वैभव पवार यांना तात्काळ शासकीय रुग्णालय उमरखेड येथे नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवलं आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली असून आरोपी अविनाश चव्हाण व त्यांच्या इतर साथीदारांवर कडक कलम लावून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश यांना दिले आहे. तसेच नायब तहसीलदार आणि तलाठी यांची प्रकृती ठीक असून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

नायब तहसिलदार पवार यांच्यावर भगवती रुग्णालय नांदेड येथे सध्या उपचार सुरु आहेत. तर हा हल्ला नेमका कुणी केला, कशासाठी केला?, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Protected Content