अदानी समूह खरेदी करणार आयपीएलचा संघ

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डानं इंडियन प्रिमिअर लीगच्या दोन नवीन टीमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली असून यातील एक संघ ख्यातनाम उद्योगपती गौतम अदानी हे खरेदी करण्याची शक्यता आहे.

 

नव्या टीमचं आधार मूल्य २ हजार कोटी ठेवलं आहे. अशावेळी केवळ ५-६ जण गंभीर बोली लावण्याची शक्यता आहे. बीसीसीआय फ्रेंचाइजीसाठी बोली लावण्यासाठी तीन कंपन्या अथवा व्यक्ती यांना परवानगी देणार आहे. या लिलावात बोली लावणार्‍या व्यक्ती अथवा कंपनीची वार्षिक उत्पन्न किमान ३ हजार कोटी असायला हवं. तसेच उलाढाल २५०० कोटी असायला हवी.

भारतात सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले गौतम अदाणी आणि त्यांचा समूह अहमदाबाद फ्रेंचाइजीसाठी बोली लावण्याची शक्यता आहे. अदाणी समूह बोली लावणार असेल तर ते नव्या टीमचे फ्रेंजाइजी मालक बनतील. तसेच अब्जाधीश संजीव गोयंका हेदेखील नव्या फ्रेंजाइजीसाठी बोली लावण्यासाठी उत्सुक आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदाणी आणि संजीव गोयंका हे दोघं लिलावात सक्रीयतेने भाग घेणार आहे. कमीत कमी ३५०० कोटी रुपयांची संभाव्य बोली लागण्याची अपेक्षा आहे. आयपीएल प्रसारण अधिकारातून जवळपास ५ बिलियन डॉलर(३६ हजार कोटी) मिळण्याचा अंदाज असल्याचं सांगण्यात येत आहे. गोयंका दोन वर्ष पुणे फ्रेंचाइजी रायजिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक होते. आयपीएल लिलावात कोटक समुह, फार्मास्युटिकलचे प्रमुख अरबिंदो फार्मा आणि टोरेंट समुहही सहभागी होऊ शकतं.

Protected Content