जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील नाचणखेडे येथील ग्रामपंचायतीच्या खुला भूखंडावर बेकायदेशीररित्या ठराव करून बांधकाम करण्यात आले असून हे बांधकाम काढून टाकत संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी नाचणखेडे येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी धरणे आंदोलन पुकारले आहे.
आंदोलकांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजला दिलेली माहिती अशी की, गावातील धार्मिक,सांस्कृतीक कार्यक्रम किर्तन, भजन, नाटक, भारूड किंवा इतर धार्मिक कार्यक्रम तसेच गाडी फिरविण्याची(वाहने वळविण्याची) जागा लहान मुलांना खेळाचे मोकळे असलेले मैदान (खुली जागा) बेकायदेशीर बांधकाम करून तुकाराम मोतीराम गोतमारे याने बळकवली आहे. याकडे संबंधीत ग्रामपंचायतीचे पुर्णपणे दुर्लक्ष असून यापूर्वी सुध्दा ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी अर्ज केलेले आहे. त्यावर आजी पदाधिकाऱ्यांनी संबंधीत जागा मालकास नोटीस काढून मनाई केली होती. खरेदी खत मांगितले होते त्यावेळी असे लक्षात आले की, हल्लीचा मालमत्ता क्रमांक ६ जागा नाचणखेडे नमुना नं.८ला लावतांना बेकायदेशीर ठराव नं.३नुसार मासिक मिटींग दि.२८/२/१९६१ नुसार ठराव करून लावण्यात आलेली आहे. तो ठराव म.मु.का.अ.सो.जि.प.जळगाव यांनी चौकशी करून त्वरीत रद्द करावा तशी माहीती दस्ताऐवजावर उपलब्ध आहे. असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करून संबंधीत पदाधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करून संबंधीतांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हेतर संबंधीत जागा मालकाने ग्रामपंचायतीच्या नमुना नं.८च्या ४०वर्षा वरील पुर्वापार खोटया दस्ता ऐवजावर संबंधीत पदधिकाऱ्यावर दबाव आणून बेकायदेशीररित्या खोटे कागदपत्र तयार करून बँकेचे कर्ज घेवून बांधकाम केल्याची खात्री आहे. हे अनधिकृत बांधकाम काढून टाकत संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या साखळी धरणे आंदोलनात राजेंद्र चौधरी, नंदकुमार जैन, भगवान गोतमारे, भिका पाटील आदी सहभागी झाले आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/934208267278027