धरणगाव (प्रतिनिधी) लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी प्रतिमा पुजन झाले. त्यानंतर साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांचे फेसबुकवरून लाईव्ह व्याख्यान पार पडले.
यावेळी साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे,कॉंग्रेस तालुका अध्यक्ष रतिलाल चौधरी ,कॉंग्रेस शहर अध्यक्ष राजेंद्र न्ह्याळदे,कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील,तालुका सरचिटणीस विकास लांबोळे, तालुका सरचिटणीस रामचंद्र महाजन,बहुजन क्रांती मोर्चाचे आबा वाघ, छत्रपती क्रांती सेना जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सामाजिक कार्यकर्ते आकाश बिवाल, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष गौरवसिंह चव्हाण, योगेश येवले, राहुल मराठे हे उपस्थित होते. यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर कॉंग्रेस युवक तालुका अध्यक्ष गौरवसिंह चौहाण यांच्या फेसबुक पेजवरुन साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांचे लाईव्ह व्याख्यान पार पडले.