जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चेतना व्यसनमुक्ती केंद्र येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राबाबत माहिती दिली. प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. म. सू. पगारे यांनी व्याख्यानाद्वारे व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांना मार्गदर्शन केले. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या विविध कार्याची माहिती त्यांनी दिली. अण्णाभाऊ यांनी मांडलेले कालसुसंगत विचार देखील प्रा. डॉ. पगारे यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन, प्रास्ताविक चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी केले. कार्यक्रमाला दीपक पाटील, प्रतीक सोनार, महेंद्र सपकाळे,जितेंद्र दुसाने, तुषार ठाकूर,राजू सोनार यांनी परिश्रम घेतले.