अडीच वर्षे झाल्यावर शिवसेना भाजपसोबत जाईल ! : आठवले

सांगली प्रतिनिधी | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ रामदास आठवले यांनी देखील राज्यात सत्तांतर होणार असून शिवसेना भाजपसोबत जाणार असल्याचे भाकीत केले आहे.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा केला आहे. लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल, असं राणे म्हणाले होते.

या पाठोपाठ आता रामदास आठवले यांनी देखील याच प्रकारचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये इतका वाद आहे की कदाचित अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर कदाचित शिवसेना महाविकासआघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत जाऊ शकते.  मला वाटतंय की हे सरकार फार काळ टिकणार नाही. मार्च असो वा एप्रिल. सरकार लवकर जाईल अशी अपेक्षा आहे, असं आठवले म्हणाले.

Protected Content