कासाबाईने आपल्या गाण्यातून केला राज्यपालांचा निषेध

बुलढाणा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या राज्यात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या एका वक्तव्याचे मोठे पडतात उमटत आहे व त्याला राज्यपालांना सामोरे जावे लागत आहे. सर्व स्तरातून सर्व पक्षातून परखड प्रतिक्रिया येत असताना आता बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका 70 वर्षे आजीने देखील यात आपली एन्ट्री केली आहे. पण ही एन्ट्री एक अभिनव सुमधुर आणि गांधीगिरी मार्गातून केली आहे का ? असे म्हटल्यास वावग ठरणार नाही तर काय आहे सविस्तर जाणून घेऊया…

राज्यपाल भगासिंग कोष्यारी यांनी नुकतेच औरगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अक्षेपर्या विधान करून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं. याचे पडसाद मात्र आता देशभराहसह राज्यात उमटत आहे. जो तो राजकीय किंवा समजिक स्तरावर निषेध करताना दिसतोय मात्र चक्क एका वृध्द महिलेने आपल्या वर्हाडी बोली भाषेत केलेला हे निषेधाचं गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही वृध्द महिला आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहे. कासाबाई जाधव असं याच नाव असून अदांजे वय ७० ते ७५ असेल, कासाबाई यांना जेव्हा समजले की राज्याचे राज्यपाल यांनी आपल्या छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वाईट उद्गार काढले तेव्हा त्यांनी चिडून जाऊन राज्यपाल यांना उद्देशून हे गाणं म्हटल आहे ज्यात त्यांनी आव्हान केलंय माझा आवाज राजभवनात जाईल का जेणे करून राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज माझ्या गाण्यातून कळतील अशी आशा या कसाबाई जाधव यांनी व्यक्त केलीय.

Protected Content