अडावद येथे नूतन ज्ञान मंदिरात मराठीचे उद्बोधन

8d623151 c45d 4962 a2f6 dbeba23194b4

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील अडावद येथील नूतन ज्ञान मंदिरात नुकतेच इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाच्या उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जे. पवार होते.

 

उद्बोधनात विवेकानंद माध्यमिक विद्यालय, चोपडा येथील मराठीच्या उपशिक्षिका माधुरी हळपे यांनी कृतिपत्रिकेचा आराखडा व सादरीकरण याबद्दल टिप्स दिल्या. प्रास्तविक एस.बी. सोनार यांनी केले तर परिचय संदीप सावळे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन सी.जी. परदेशी यांनी केले तर आभार एस.आर. बोरसे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content