अजित पवारांसह ६९ जणांना क्लीन चिट

मुंबई: वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील कथित घोटाळ्यात नाव असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. अहवालात अजित पवारांसह ६९ जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

शिखर बँकेत २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीनं संचालक मंडळावर ठपका ठेवला होता. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन करत कर्जवाटप केल्यानं बँकेला फटका बसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. अजित पवार, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ यांच्यासह विविध पक्षांतील ६९ बड्या नेत्यांचा या संचालक मंडळात समावेश होता. रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप करत हे संचालक मंडळ बरखास्त केलं होतं व चौकशीचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने या क्लोजर रिपोर्टला विरोध केला आहे.

Protected Content