जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौकातील भंगार बाजार येथील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी महानगरपालिकेने भाडेतत्तावर जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी भंगार बाजारातील व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता भेट घेवून मागणीचे निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळ भंगार बाजार आहे. गेल्या आठवड्यात जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करत भंगार बाजार परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे आता येथील भंगार बाजारातील व्यवसाय करणारे ११७ व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जळगाव महापालिकेने व्यावसायिकांचा विचार करून पुढील ९९ वर्षांसाठी जागा भाडे तत्वावर देण्यात यावी, या मागणीसाठी भंगार व्यावसायिकांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना भेट घेवून निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर फारूख शेख, सैय्यद चांद सैय्यद अमीन, मझहर पठाण, जमील देशपांडे, अहेमद हुसेन, जाकीर पठाण, अनिस शहा, अन्वर खान, मतिन पटेल, सईद शेख , रईस बागवान, कासीम उमर, मोहसीन युसूफ यांच्यास आदी व्यावसायीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.