बेंडाळे महिला महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.आण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेल्या 102 विद्यार्थी विद्यार्थिनींनी भारतीय भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविले. ही स्पर्धा दोन भागांत घेण्यात आली.
पहिल्या भागात 102 विद्यार्थ्यांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात आली व त्यातून निवड झालेल्या 12 विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा दुसऱ्या भागात घेण्यात आली.

या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात क. ब. चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संजय रणखांबे उपस्थीत होते. तर पारितोषिक वितरण समारंभास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एन. तायडे उपस्थित होते.

शेवट पर्यंत चुरशीची झालेल्या या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक डॉ. आण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी निकिता तायडे व निकिता लोधी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकाविले.

तृतीय पारितोषिक एच.जे. थीम महाविद्यालयाची विद्यार्थिनी मेहक शेख इक्बाल हिने पटकाविला तर उत्तेजनार्थ पारितोषिक नूतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थी नंदराज नारायण काळे व डॉ. अ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिपाली ईश्वर परदेशी विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 3075, 2075, व 1575 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचलन व आभार डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले.

महाविद्यालयाच्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या नेतृत्वात पार पडलेल्या या स्पर्धांच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या मार्गदर्शनात प्रा. दीपक पवार, प्रा. दिपक कीनगे, डॉ. विनोद नन्नवरे, डॉ. सचिन कुंभार, प्रा. निलेश कोळी, डॉ. अशोक पाटील, डॉ. रुपाली चौधरी, प्रा. प्रियांका आठे, प्रा. मिताली आहिरे, प्रा. योगिता सोनवणे, प्रा. नीलिमा मेंडकी, प्रा. ऐश्वर्या परदेशी, प्रा. सुचित्रा लोंढे व प्रा. शिरीष झोपे यांनी कार्य केले.

 

Protected Content