जळगाव प्रतिनिधी । चाळीसगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अवमान करणाऱ्या भाजपचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी शिवप्रेमींच्या मागणीवरून कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हात जोडून नाकघासणी करून माफी मागितली. यावेळी कडेकोट पोलीसांचा बंदोबस्त होता.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ०५ मे २०२० रोजी शहरातील देवकर मळा भागातील रात्री २३:१५ वाजता झालेल्या भांडणाच्या कारणाने फिर्यादी श्रीमती पाटील यांचे दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहरातील नगरसेवक व त्याचे ५ कुटुंबीय अशा विरोधात तक्रार देण्यात आली होती. यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या बॅनरचा उपयोग मजुरांच्या प्रसाधनगृहासाठी केला व महाराजांच्या फोटोची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्या तसेच याचा जाब विचारला असता आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलांना तलवारीने वार करीत मारहाण केली व फिर्यादीचे कपडे फाडून तिचा विनयभंग करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात आला होता. या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी राजेंद्र रामदास चौधरी व इतरांसह ६ मे २०२० रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
जिल्हा न्यायालयाच्या आवारात शिवप्रेमींचा घेराव
फिर्यादीच्या मुलांना तलवारीने मारहाण केली होती यासंदर्भात न्यायालयीन कामकाज आज जिल्हा न्यायालयात होते. फिर्यादी आणि संशयित आरोपी नगरसेवक राजेंद्र चौधरी हे जिल्हा न्यायालयाच्या आवारात दुपारी १.३० ते २ वाजेच्या सुमारास उपस्थित झाले. त्यावेळी शिवप्रेमींची यांनी त्यांना घेराव घालत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर माफी मागावी अशी मागणी केली. यावर उडवाउडवीची उत्तरे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी दिल्यानंतर शिवप्रेमी संतप्त झाले. दरम्यान न्यायालयाच्या आवारात गोंधळ सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली.
शिवरायांच्या पुतळ्यासमोर येवून केली नाकघासणी
अर्धातासांच्या गोंधळानंतर पोलीस पथकाच्या उपस्थितीत नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येवून नाकघासणी करून माफी मागीतली. त्यानंतर शिवप्रेमी यांनी समाधान व्यक्त गोंधळ आटोक्यात घेतला.
https://www.facebook.com/watch/?v=2709456552657443