चाळीसगाव तालुक्यात ८ ते १० दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करा : संभाजी सेनेची मागणी

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोजच्या रोज कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे तरी भविष्यात हे प्रमाण जास्त वाढू नये म्हणुन किमान ८ ते १० दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्यात यावा अशी मागणी संभाजी सेनेतर्फे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

चाळीसगावकर जनतेच्या आरोग्यासाठी अगदी लवकरात लवकर जळगाव, भुसावळ व अमळनेरप्रमाणे निर्णय घेऊन चाळीसगाव तालुक्यात किमान ८ ते १० दिवसांच्या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी संभाजी सेनेतर्फे करण्यात आली आहे.  जनता कर्फ्यू न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ पाटील, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, शहर अध्यक्ष अविनाश काकडे, संदीप जाधव, लक्ष्मण बनकर, बंटी पाटील, कृष्णा पाटील, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर पगारे, सुनील पाटील, सचिन जाधव, सुरेश पाटील, सुरेश तिरमली, भैय्यासाहेब देशमुख, तात्या ठोके, प्रवीण जाधव,बापूराव पाटील, राकेश पवार, रवींद्र शिनकर, प्रवीण पाटील आदींच्या सह्या आहेत.

Protected Content