अक्सा नगर रहिवाशांतर्फे डॉक्टरांचा जाहीर सत्कार

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील मेहरुण परिसरातील अक्सा नगर रहिवाशांतर्फे वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक डॉक्टर अविरत सेवा बजावत आहेत. सेवा बजावताना स्वत:च्या जीवाची बाजी लावली आहे. त्यामुळे या डॉक्टरांचे मनोबल वाढवून त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता अक्सा नगर रहिवासींनी एकत्र येत शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी मनपाचे माजी प्रभाग समिती सदस्य फिरोज खान मुलतानी, फिरोज शेख अब्बास, रोशन शेख मुनाफ, फिरोज पठाण, मोहम्मद वसीम, मोहसीन शेख नवाब, प्रा.मुस्तकीम बागवान, अकबर शेख, दानिश जब्बार आदी नागरिकांनी रुग्णालयात जाऊन सन्मान केला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना कोरोना आजाराविषयी मार्गदर्शन केले. घरात व परिसरात स्वच्छता ठेवा, सॅनिटाईझेशन करा, लहान व वृद्ध लोकांची काळजी घ्या, आवश्यकतेनुसार घराबाहेर तरुणांनी बाहेर जावे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन्न शिजवून खावे अशा टिप्स डॉक्टरांनी यावेळी नागरिकांना दिल्या.

सन्मानार्थी डॉक्टर
डॉ.रियाज शेख, डॉ.माजीद खान व डॉ.शाहिद खान (ममता हॉस्पिटल), डॉ.प्रवीण पाटील (मन:शांती हॉस्पिटल), डॉ.अनिस शेख (हयात हॉस्पिटल), डॉ.अल्ताफ खान, डॉ.शोएब शेख, डॉ.मिनाज पटेल, डॉ. अल्तमश हसन.

Protected Content