



जळगाव प्रतिनिधी । चोरीच्या दुचाकीवर संशयास्पद फिरणाऱ्या दोघांपैकी एकाला पाठलाग करून अटक केली असून दुसरा फरार झाला. त्याच्या ताब्यातील चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीस पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी स.फौ. अतुल वंजारी, पो.कॉ इम्रान सैय्यद, पो.कॉ. असीम तडवी. पो.कॉ. मुकेश पाटील हे पेट्रोलिंग करत असतांना टीपु सुलतान चौकात दोन जण संशयित दुचाकीवर फिरत असतांना आढळून आले. त्याची चौकशीकरीत जवळ जात असतांना दोघांपैकी संशयित आरोपी मुख्तार शेख सत्तार रा. टीपु सुलतान चौक हा दुचाकीवरून उतरून पळ काढला तर दुचाकीवर बसलेला दुसरा संशयित आरोपी राहुल गणेश महाजन (वय-२१) रा. टिपू सुलतान चौक ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता दोघांनी गणपती नगरातून वापरत असलेली ४० हजार रूपये किंमतीची होंडा शाईन (एमएच १९ बीके १४४५) दुचाकीची चोरी केल्याचे कबुल केले. संशयित आरोपी राहुल महाजन यांच्यासह फरार आरोपी मुख्तार शेख सत्तार यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, दुचाकी चोरी केल्याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पुढील कारवाईसाठी दुचाकीसह संशयित आरोपी गणेश महाजन याला रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


