अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीचं छत कोसळून १७ जणांचा मृत्यू !

 

 

लखनौ : वृत्तसंस्था | उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यात मुरादनगर परिसरातील स्मशानभूमीचे छत कोसळल्याने दबून १७ जणांचा मृत्यू झाला अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्या गेले असून, बचावकार्य सुरू आहे. ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं विभागीय आयुक्त अनिता मेश्राम यांनी सांगितलं आहे.

अत्यसंस्कारसाठी आलेले लोकं पाऊस आल्याने एका छताखाली उभे राहिले होते. तेवढ्यात त्यांच्या अंगावर छत कोसळलं व ते सर्वजण दबल्या गेले. घटनेची माहिती मिळाताच पोलीस व एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली व बचावकार्य सुरू झालं.

या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “मी जिल्हा अधिकार्‍यांना मदतकार्य राबवण्याच्या व घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनेतील पीडित व्यक्तींना सर्वतोपरी मदत केली जाईल” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.

Protected Content