मुंबई (वृत्तसंस्था) विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार असून वर्षभरात मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांना ग्रेड दिला जाणार असल्याची माहिती उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.
उच्चशिक्षणाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यासाठी शनिवारी मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री आणी कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे चर्चा झाली. दोन तासाच्या चर्चेनंतर जुलै महिन्यात परीक्षा न घेता अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार गुण देण्यावर एकमत झाले. परंतू दिलेल्या ग्रेडवर जर कुणाचा आक्षेप तर परीक्षा देण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बाबतचा अंतीम निर्णय लवकरच होईल, असे प्राजक्त तनपूरे यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.