अंजाळे जवळच्या पुलावर अपघात : मोटारसायकल स्वार ठार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंजाळे ते भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर चारचाकी व दुचाकी वाहनाचा अपघात होऊन यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटाच्या मोर नदी वरील नवीन बांधलेल्या पुलावर शुक्रवार दिनांक २२ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास यावल कडुन भुसावळकडे जाणार्‍या मारूती ईको वाहन क्रमांक एमएच ०१ सिपी३२१८ या वाहनाने भुसावळ कडून येणार्‍या मोटरसायकल क्रमांक एमएच १९ईडी ०४३२ या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये मोटरसायकल चालक राजू भिका शिंदे ( वय २५ वर्षे, राहणार देऊळगाव गुजरी तालुका जामनेर ) यांना या भिषण अपघातात गंभीर दुखापत होवुन ते जागीच मरण पावल्याची घटना घडली आहे. याबाबत विकास विश्वनाथ शिंदे (वय २५ वर्ष, रा. आमोदे, तालुका यावल) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्याने यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अपघातास व मोटरसायकल चालक राजु शिंदे यांच्या मृत्युस कारणीभुत मारूती ईको चारचाकी वाहन चालक सचिन संजय कोळी (राहणार अंजनसोडा, तालुका भुसावळ ) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Protected Content