जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकानजीकच्या भजे गल्लीतून एका हात मजुराची दुचाकी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात मंगळवारी २० जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्याधर गणपत इंगळे (वय-४०) रा. किसनराव नगर, जळगाव हातरून आपल्या परिवारासह वास्तव्याला असून हात मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतो 13 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता सुमारास विद्याधर इंगळे हा त्याची दुचाकी (एमएच १९ एवाय ९१७१) ने जळगाव शहरातील नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या भजे गल्लीतील हॉटेल मिनर्वा येथे आले होते. दरम्यान त्याठिकाणी विद्याधर इंगळे याने दुचाकी पार्क करून लावली. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्याधर इंगळे यांनी परिसरात शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर मंगळवारी २० जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.