हॉटेल टुरिस्ट समोरून रिक्षा चालकाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरू चौकातील टुरिस्ट हॉटेल जवळून एका रिक्षाचालकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 2 मे रोजी रात्री 9 वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात रविवारी 5 मे रोजी दुपारी 1 वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद शरीफ मोहम्मद याकूब बागवान वय- 47 रा. शाहूनगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान 2 मे रोजी रात्री 9 वाजता ते कामाच्या निमित्ताने त्यांची दुचाकी एमएच १९ डीई ८८०० वर जळगाव शहरातील नेहरू चौकात असलेल्या टुरिस्ट हॉटेल जवळ आले होते. त्यावेळी त्यांनी त्याठिकाणी दुचाकी पार्किंगला लावली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना उघडतील आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर मोहम्मद शरीफ यांनी रविवारी 5 मे रोजी दुपारी 1 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहे.

Protected Content