हिराशिवा कॉलनीत महिलेचे बंद घर फोडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटेनगर परिसरात असलेल्या हिराशिवा कॉलनीत महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिन्यासह रोकड असा एकुण ३३ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी शनिवारी १३ मे रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या हिरा शिवा कॉलनीत नम्रता महावीर गादिया (वय-५०) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार १३ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नम्रता गादिया या मैत्रिणीच्या घरी जेवणासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घर बंद करून कुलूप लावलेले होते. या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच १० हजारांची रोकड असा एकूण ३३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी २ वाजता नम्रता गादिया घरी आल्या त्यावेळेस त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कुलूप तुटलेला दिसून आला. त्यांनी आत प्रवेश करून पाहणी केली असताना घरातील  समान अस्तव्यस्त असलेले दिसून आला. याप्रकरणी त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content