यावल येथे वनकर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वनविभागाच्या सभागृहात पुर्व वनपरिक्षेत्र कार्यालयात धुळ्याचे वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली  मानव – वन्यजीव संघर्ष, वने व वन्यजीव संरक्षण कामात उपयोगी असलेले साहित्य , हत्यार वापरणे, हाताळणे याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

 

याप्रसंगी यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जामीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत BMR Wildlife Services इंदौर (मध्ये प्रदेश) संस्थेचे प्रमुखओमप्रकाश शहा, श्रीमती भारती निरखे आणि गौरव धावडे पाटील यांनी वनअधिकारी, वनकर्मचारी यांना दुर्बीण,कापडी तंबू, जीपीएस यंत्र, ट्रॅप कॅमेरा यांच्यासह ट्रान्क्युलाईज गन, रेंज फायटर,स्नेक स्टीक, फायर ब्लोअर, ग्रास कटर, शील्ड, हेल्मेट आणि चेस्ट गार्ड प्रोटेटोर आदी कर्तव्याचे पालन करतांना वन विभागाच्या कार्याला अधिक बळकट करणारे आवश्यक साहित्याचा वापर करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.

 

यावल येथे पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत वनअधिकारी, वनकर्मचारी यांनी प्रत्यक्ष हाताळले तसेच प्रशिक्षण कार्यशाळेत यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जळगाव जमीर शेख यांनी उपस्थित वन अधिकारी, वन कर्मचारी यांना वन्यजीव संरक्षण आणि जंगल संरक्षण कामाबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रथमेश हाडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल/चोपडा  यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविका केली तर प्रशिक्षण कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सुगसंचालन व उपस्थितांचे आभार यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेअधिकारी विक्रम पदमोर यांनी मानले .

 

या प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थितीत सुनील भिलावे (वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम), अजय बावणे (वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर), आनंद पाटील (वनपरिक्षेत्र अडावद), समाधान सोनवणे (वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर ), गोपाल बडगुजर वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी आणि यावल वनविभागाचे वनपाल, वनरक्षक क्षेत्रिय कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .

Protected Content