संतापात भाजी विक्रेत्यानं केलं असं काही… कुटुंबाचा आक्रोश

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संतापाच्या भरात माणूस एकतर स्वत:ला संपवितो किंवा एखाद्याचा जीव घेतो अशी अनेक उदाहरणे आहे. असाच काहीसा प्रकार यावल तालुक्यातील मनवेल येथे घडला आहे. भाजी विक्रेत्या तरूणाने संतापाच्या भरात राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. या कृत्यामुळे कुटुंबाने मोठा आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

 

यावल तालुक्यातील मनवेल येथे नितिन अमृत कोळी, वय ३१ हा तरूण वास्तव्याला होता. भाजीपाला विक्री करून आपला प्रपंच चालवित होता.  किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून त्याने सोमवारी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्यापुर्वी राहत्या घरात साडीच्या मदतीने  गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. याबाबत मयताचे काका शांताराम पंढरीनाथ कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत नितिन कोळी याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

Protected Content