चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील सात वर्षीय चिमुकलीला घरी सोडून देतो असा बहाणा करून एकांत ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात एकाला अटक केली असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात ७ वर्षीय चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील स्टेशन रोड येथे चिमुकली ही कामानिमित्त आलेली होती. दरम्यान “घरी सोडून देतो” असे सांगून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय-२९) रा. नारायणवाडी, चाळीसगाव याने स्कुटीवर बसून तिला शहरातील टेनिस ग्राउंड येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान चिमुकली रडू लागल्याने तिला घरी सोडून देऊन “तू जर आई-वडिलांना सांगितले, तर तुला मारून टाकेल” अशी धमकी दिली. दरम्यान आपल्यावर झालेला प्रसंग चिमुकलीने तिच्या आईजवळ कथन केला. ही धक्कादाय घटना घडल्यानंतर पीडित मुलीसह तिची आई यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सुपड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.