शरद पवार यांच्या सभेत चोरट्यांचा धुमाकुळ !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेतील गर्दीचा फायदा घेत अनेकांच्या खिश्यातील मोबाईल आणि रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसांनी चार जणांना अटक केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमळनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबीराचे आयोजन शुक्रवारी १६ मे रोजी दुपारी १ वाजता करण्यात आले होते. यावेळी आयोजित शिबीरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असल्याने जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे या गर्दीचा फायदा घेत कार्यकर्ते गौरव उदय पाटील (वय-४२) रा. अमळनेर यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यांच्या खिश्यातून मोबाईल आणि रोकड चोरट्यांनी लांबविली. पोलीसांनी चौकशी अंती संशयित आरोपी समिर शहा सलीम शहा (वय-२२) रा. धुळे, हमिद अली मोहमद उमर (वय-४२), उमर फारूख शेत लतीफ (वय-२२) दोन्ही रा. मालेगाव आणि भैय्या विक्रम खैरनार (वय-३८) रा. धुळे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गौरव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक घनश्याम पवार करीत आहे.

Protected Content