अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी  दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी  ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भोकर येथील रहिवासी १६ वर्षी अल्पवयीन मुलगी ही धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील नातेवाईकांकडे राहत होती दरम्यान सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली.

तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर तिच्या वडिलांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास  अज्ञात व्यक्ती विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोती पवार करीत आहे.

Protected Content