व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरूणीवर अत्याचार

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरूणीला संशयित आरोपी विष्णू उर्फ विश्वनाथ संतोष पवार याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखविले. हा प्रकार सन २०१९ पासून सुरू होता. त्यानंतर तूला बोलावल्यानंतर तू जर आली नाही तर माझ्या मोबाईलमधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. तसेच लग्नाचे आमिष दाखवत करगाव रोडवरील पडलेल्या खोलीत नेत तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्यानंतर पिडीत तरूणीने लग्नाची मागणी केली परंतू संशयित आरोपी विष्णू पवार याने लग्नास साफ नकार दिला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विष्णू उर्फ विश्वनाथ संतोष पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहे.

Protected Content