चिंचपूरा शिवारात वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचपूरा शेत शिवारात वीस कोसळून पडल्याने गाय व गोऱ्हा जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे.

 

पाचोरा तालुक्यातील चिंचपूरा परिसरात बुधवारी २२ जुन रोजी संध्याकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून चिंचपुरे येथील शेतकरी वेडुबा ओंकार पाटील यांच्या शेतात एक गायीचा व एक गोऱ्ह्याचा मृत्यू झाला. संध्याकाळच्या वेळी जोरदार वादळ सुरू झाले. पावसाचा अंदाज विजांचा कडकडाट झाला. यावेळी विज अंगावर पडून गायीचा व गोऱ्ह्याचा जागीच मृत्यू झाला. विजेचा आवाज एवढा भयानक होता की, परिसरातील जनावरे व शेतात काम करणारे शेतकरी धास्तावले होते. या घटनेत परिसरात मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी यांनी केली आहे. पहिल्याच पावसात ग्रामीण भागात शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!