वृध्दाचे बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविले

भडगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सेवानिवृत्त व्यक्तीचे बंद घर फोडून घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख १६ हजार ५००  रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शुक्रवार १२ मे रोजी रात्री ९ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भडगाव पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, सुभाष माधव मोराणकर (वय-७१) रा.गोंडगाव ता. भडगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ९ मे रोजी सकाळी ७ वाजता त्यांनी त्यांचे घराचे मुख्य दरवाजा बंद करून कामाच्यानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी  बंद घर फोडून घरात प्रवेश करत कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण २ लाख १६  हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार ११ मे रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला.  सुभाष मोराणकर यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Protected Content