वाघोदा बुद्रुक येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना  रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी परिस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पहिल्या तक्रारीत मयूर शांताराम माळी यांनी म्हटले आहे की, वाघोदा गावातील सैय्यद वाडा येथील गल्लीतून बुलेट गाडीवरून जात असतांना हॉर्न वाजविला होता. रस्त्यावरील मुलगा बाजूला झाला नाही म्हणून सुरूवातीला वाद झाला. त्यानंतर इलियास खान, सोहिल खान, अलताफ खान उर्फ हवा, उज्जेफखान, मोईन खान, युनूस मिस्तरीचा मुलगा, रिक्षावाला इम्रान खान, वाजीद खान, आवेश खान सर्व रा. वाघोदा बुद्रुक ता. रावेर यांनी मयूर शांताराम माळी व तिच्या परिवारातील सदस्यांना लोखंडी पहारने डोक्यावर मारहाण केली. तर मयुरची आई, वडील व काका हे आवराआवर करण्यासाठी आले असता त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करून ढकलून दिले. व जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

 

तर दुसऱ्या तक्रारीत फैजलखान इस्माईल खान याने म्हटले आहे की, बुलेट गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून मयुर शांताराम माळी, गजानन वसंत माळी, शांताराम माळी आणि आदित्य माळी सर्व रा. वाघोदा बुद्रुक ता. रावेर यांनी शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील करीत आहे.

Protected Content