वडनगरी फाट्याजवळून तासभरातच तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावरील वडनगरी फाट्याजवळून तरुणाची दुचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी सोमवार, २२ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील फुफनगरी येथील किरण हिरामण सोनवणे वय २७ हा तरुण २१ मे रोजी जळगाव शहरातील कानळदा रोड पसिरात आला होता, यादरम्यान त्याने सायंकाळी ५ वाजता त्याची एम.एच.१९ ई सी १६१९ या क्रमाकांची दुचाकी वडनगरी फाट्याजवळ उभी केली होती. तासाभरानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याला त्याची उभी केलेली दुचाकी मिळून आली नाही सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री किरण सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यात तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिेनेश पाटील हे करीत आहेत.

Protected Content