निपाणे प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

पाचोरा पोलीस ठाण्यात मनसेचे निवेदन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील निपाणे येथे मागासवर्गीय वृध्द महिलेच्या प्रेताला स्मशानभूमीत जाण्यास मज्जाव करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना देण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली असून एका दलित वृध्द महिलेच्या प्रेताला स्मशानभुमीत जाण्यास गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, गावातील सरपंच व इतर लोकांनी विरोध केला त्यामुळे संबंधीत नातेवाईकांनी महिलेचे प्रेत स्मशानभुमीच्या बाहेर भर पावसात जाळल्याची दुर्दैवी घटना घडली असुन यातील आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याप्रसंगी पाचोरा शहर अध्यक्ष रुषीकेष भोई, शहर संघटक हर्षल अहिरे, उपशहर अध्यक्ष रोहीत पाटील, यश रोकडे, सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदुले, प्रशांत पाटील, जितेंद्र नाईक, अमोल म्हस्के, पवन पाटील, वाल्मिक जगताप, दिपक ठाकुर सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सदर घटना ही अतिशय वेदना देणारी असून अशा घटनेंमुळे शरमेने मान खाली जाते. एका लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारे कृत्य घडले. हे निश्चीतपणे निषेधार्थ आहे. जी व्यक्ती देवाची खोटी शपथ घेवू शकतो. त्या व्यक्तीकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवणे मुळातच चुकीचे असल्याचे त्यांचे या कृत्यावरुन सिध्द होते. पाचोरा पोलिस स्टेशनला संबंधीत आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल असून आजही काही आरोपी मोकाटपणे गावात फिरतांना निदर्शनास आढळून आले. याचा अर्थ संबंधीत आरोपींना कायदयाचा धाक राहीला नसल्याचे दिसून येते. सदर आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे असून माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील हे शिंदे गटाचे जिल्हाअध्यक्ष असल्याने आरोपींना तात्काळ अटक करावी‌ व कडक शासन व्हावे जेणे करुन समाजामध्ये अशा वाईट प्रवृत्ती निमार्ण होणार नाही अशी मागणी निवेदनात द्वारे करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल. असेही निवेदनाद्वारे प्रशासनास कळविण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content