जळगावातील ओरिऑन इंग्लिश मेडीयम स्कूलचा निकाल १०० टक्के

जळगाव प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्यूकेश सोसायटी संचलित ओरिऑन इंग्लिश मेडीयम स्टेट बोर्ड स्कुलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. शाळेतील १५३ विद्यार्थी विषेश श्रेणीमध्ये आलेत व १०० विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आले.

माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ नाशिक यांच्यातर्फे मार्च २०१९-२०२० यावर्षी दहावीच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. परिक्षांचा आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला. शाळेतून एकूण २७५ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. हे सर्व विद्यार्थी पास झालेले आहेत. यापैकी १५३ विद्यार्थी विषेश श्रेणीमध्ये आलेत व १०० विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आले. शाळेतून प्रथम राहुल महेंद्र पाटील (९६.६०), द्वितीय दिपक किशोर पाटील (९५.४०) व तृतीय क्र. साहिल चंद्रमोहन तांबटकर (९४.८०) विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमारजी बेंडाळे, डी.टी.पाटील, शशिकांत वडोदकर , शाळेचे प्राचार्य संदीप साठे या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुध्दा अभिनंदन केले.

Protected Content