‘लिव्ह-इन’ पार्टनरचे तुकडे करून शिजवले : देश हादरला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मीरा भाईंदर येथील ‘लिव्ह-इन’ पार्टनरची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण देश हादरला आहे.

 

काही महिन्यांपूर्वी उघड झालेल्या श्रध्दा वालकर या तरूणीच्या मृत्यूप्रमाणेत मुंबईच्या मीरारोड येथे भयंकर प्रकरण घडली आहे. मिरा रोडमध्ये राहणार्‍या मनोज सानेने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. एवढंच नाही तर हत्येनंतर त्याने लाकूड कापण्याच्या मशीनने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक करुन त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शेजार्‍यांना त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

 

मनोज साने याने सरस्वती वैद्य या आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्यात केली आहे. त्याच्या  फ्लॅटमध्ये  फ्लॅटमध्ये महिलेचे पाय पोलिसांना सापडले, त्यानंतर घरातल्या एका बादलीत आणि पातेल्या महिलेचं धड आणि शीर यांचे तुकडे होते. कुकरमध्ये ते शिजवून लपवण्यात आले होते. काही भाजलेले तुकडेही पोलिसांना आढळून आले आहेत. वुड कटरच्या वापराने त्याने लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक केले. काही तुकडे कुकरमध्ये शिजवले. या सगळ्या तुकड्यांची तो विल्हेवाट लावत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मनोज साने याला बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

Protected Content