जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुळजी जेठा महाविद्यालय इव्हेंट मॅनॅजमेण्ट विभागाने “खान्देश गॉट टॅलेंट 2022″चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे आमदार सुरेश भोळे, नगरसेवक अश्विन सोनवणे, अनिकेत पाटील (अध्यक्ष, जळगांव पीपल्स बँक), डॉ हर्षवर्धन जावळे ( सदस्य, के. सी. ई सोसायटी ) वैशाली सूर्यवंशी (संचालिका निर्मल सिडस् ) राजेश झाल्टे (संचालक, झाल्टे बिल्डर्स ) प्रवीण कुंजीवाल ( बिजनेस हेड, स्पेक्टरम इलेक्ट्रिकल ) सुनील चौधरी ( अध्यक्ष,कर्तव्य बहुउद्देशीय संस्था धरणगाव ),पी. ई. पाटील, डॉ गौरव महाजन (संचालक ,प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल ) टेनू बोरोले (कृषी उद्योजक ) मनोज पाटील (अध्यक्ष त्रिमूर्ती फौंडेशन ) प्रा. सं. ना.भारंबे (प्राचार्य मू.जे. महाविद्यालय ) विनोद सोनार ( संचालक ऍक्टिव्ह कॉम्प्युटर ) यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये 32 स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. त्यातून 16 स्पर्धे्कांना बक्षीस देण्यात आले. विजेत्या स्पर्धेकांचे गितगायन ख़ुशी पांडे, अंजली मोरे, अथर्व मुंडेले,चारुल पाटील, अनुश्री लोडते, राहुल सपकाळे, नृत्य आशी अग्रवाल, भूमी सोनवणे, राहुल यादव, डी. डी. एस ग्रुप, ड्रीम डान्स अकॅडेमी, एमएच 19ग्रुप, डेनेवो डान्स ग्रुप, ड्यूट डान्स कार्तिक व दीपक, राहुल व वैष्णवी या सर्वाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन श्याम जगताप यांनी केले.कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून मोहन तायडे व नरेश बागडे होते. कार्यक्रम यशश्वितेसाठी संपूर्ण इव्हेंट मॅनॅजमेण्ट टीमने परिश्रम घेतले.