मुलीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या विवाहितेला पहिल्या पतीकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मुलीला ताबा घ्यायला विवाहितेला पतीसह तिच्या आईला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना  घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना अमर जाधव वय २९ रा. संभाजीनगर, नगर नाका, ता.जि. बीड या ठिकाणी परिवारासह वास्तव्याला आहेत. १ जून रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास सपना जाधव ह्या जळगावातील वाघनगरात राहणाऱ्या त्यांचे पहिले पती यांच्याकडे मुलीचा ताबा घेण्याकरीत आल्या होत्या, याचा राग आल्याने देवीदास रामचंद्र खामकर, चंद्रकला रामचंद्र खामकर व मनोज रामचंद्र खामकर सर्व रा. वाघनगर या तिघांनी सपना जाधव यांच्या आई संगीता सोनवणे व पती अमर जाधव यांना शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी केली, यादम्यान एकाने सपना यांच्या आईच्या डोक्यात वीट मारुन दुखापत केली, व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सपना जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन देवीदास रामचंद्र खामकर, चंद्रकला रामचंद्र खामकर व मनोज रामचंद्र खामकर सर्व रा. वाघनगर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उषा सोनवणे हे करीत आहेत.

Protected Content