माध्यमिक शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी निवडणूकीसाठी मतदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या १५ जागांसाठी रविवारी २१ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेच्या दरम्यान शहरातील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मतदान घेण्यात आले. यात परिवर्तन पॅनलच्या विरोधात सहकार पॅनल आणि दोन अपक्ष उमेदवार यांच्या लढत होत आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या सार्वत्रिक निवडणूक सन २०२३ ते २०२८ साठी संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी मतदान होत आहे. यात परिवर्तन पॅनलच्या विरोधात सहकार पॅनल आणि दोन अपक्ष उमेदवार यांच्या लढत होत असून एकुण ३२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहे. रविवारी २१ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील तालुकास्तरावर मतदान झाले. या अनुषंगाने जळगाव शहरातील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मतदार केंद्रावर रविवारी २१ मे रेाजी मतदान झाले. जळगाव जिल्ह्यातील मे हिट मुळे मतदारांना सकाळी मतदान करण्यास पसंत केले होते. मतदानांना सोमवारी २२ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीनंतर नेमके कोणते पॅनलचे वर्चस्व राहणार आहे हे दिसून येणार आहे.

Protected Content