महिलेसह तिच्या पतीला मारहाण करून दागिन्यांची पर्स लांबविणाऱ्या दाम्पत्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तांबापुरा परिसरातील गौतमनगर येथे मागील भांडणाच्या कारणावरुन महिलेसह तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणी दरम्यान महिलेची रोकड तसेच दागिणे असलेली ३३ हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबविल्याची सुध्दा घडली होती. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी मारहाण करत पर्स लांबविणाऱ्या महिलेसह तिच्या पतीला अटक केली आहे. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संजना फरहान शेख व तिचा पती फरहान शब्बीर शेख असे अटकेतील दोघा संशयितांची नावे आहेत.

 

गौतम नगर येथे तबस्सुम आरा इक्बाल खान तिच्या पतीला संजना फरहान शेख व तिचा पती फरहान शब्बीर शेख दोन्ही रा. तांबापुरा यांनी मारहाण केली होती. यादरम्यान संजना हिने तबस्सुम हिच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेत दुखापत केली होती तसेच तबस्सुमकडील पर्स जबरीने घेऊन पर्स मधील २ हजार ७०० रुपये रोख  व चांदीची अंगठी असा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणी तबस्सुम खान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी , इमरान सय्यद, इमरान बेग यांच्या पथकाने संजना शेख व फरहान शेख या दोघांना अटक केली,  त्यांच्याकडून  संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Protected Content