जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करत धमकी देत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीवारी १३ मे रोजी सकाळी १० वाजता जामनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह राहते. १३ मे रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास महिला ही महादेव मंदीरात दर्शनासाठी जात असतांना गावात राहणारा परमेश्वर उर्फ छोटू भगवान लुकडे याने महिलेचा रस्ता आडविला. नंतर महिलेचा हात पकडून अंगावर ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. आणि “तु माझ्या मनासारखे वाग नाहीतर मी तुला सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याची पत्नी किरण परमेश्वर लुकडे हीने महिलेला शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी परमेश्वर उर्फ छोटू भगवान लुकडे आणि त्याची पत्नी किरण परमेश्वर लुकडे या दोघांवर शनिवारी १३ मे रोजी सकाळी ९ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश महाजन करीत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.