महाविकास आघाडीचाच सभापती होणार:-आ.अनिल पाटील

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  अमळनेर बाजार समितीचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित ११ संचालक आघाडीच्या नेत्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले असून १६ तारखेला सभापती निवड असून सभापती हा महाविकास आघाडीचाच होणार असल्याचा आशावाद आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

 

बाजार समितीच्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सचिन बाळू पाटील,प्रा.सुभाष पाटील,सुरेश पाटील,अशोक आधार पाटील,डॉ.अशोक हिम्मत पाटील,भोजमल पाटील,समाधान धनगर,भाईदास भिल्ल,सुषमा देसले,पुष्पा पाटील,अपक्ष नितीन पाटील असे  ११ संचालक महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

 

यात महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेले प्रकाश अमृतकर,वृषभ पारख हे २ व्यापारी त्यांचा आडत व्यवसाय तसेच शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातच थांबले आहेत तर काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.अनिल शिंदे हे अत्यावश्यक शस्त्रक्रिया तसेच रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदारांच्या आदेशानेच मुंबईला जाऊ शकले नाहीत.मात्र आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत असे त्यांनी सांगितले आहे.

१६ तारखेच्या सभापती निवडीकडे आता तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Protected Content