महापालिका कर्जमुक्त झाल्याचे आमदारांचे सांगणे चुकीचे — विष्णू भंगाळे (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । महापालिका कर्जमुक्त झाल्याचे आमदारांचे सांगणे चुकीचे असल्याचा ठपका आज ज्येष्ठ नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी आमदार राजूमामा भोळे  यांच्यावर ठेवला.

रोट्रॅक्ट क्लबने आयोजीत केलेल्या ” चला विकास शोधू या ” या कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे हजर राहू शकले नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेलि असली तरी आमचे समाधान झालेले नाही असे सांगत जनता सुज्ञ आहे जनतेला सगळे माहिती आहे असेही विष्णू भंगाळे म्हणाले. आमच्या सत्तेच्या काळात महापालिकेने दर महिन्याला ३ कोटी रुपये भरून कर्ज चुकते केले आहे जिल्हा बँकेचेही कर्ज आहे सगळे मिळून आजही १२५ कोटी रुपये कर्ज महापालिकेवर आहे ते सागर माफ झाले असते तर त्यांनी महापालिका कर्जमुक्त केली असे म्हणता आले असते मात्र त्यांची भाषा वेगळी आहे कॉम्प्लेक्सच्या वसुलीतून बाजूला काढून ठेवलेले १८ कोटी रुपये सुद्धा आमच्या सत्तेच्या काळात भरले गेले आहेत , असेही ते म्हणाले .

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/147035280529019

Protected Content