मंत्री गिरीश महाजन यांनी मोदी सरकारच्या विकास कामांची वाटली पत्रके

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरांमध्ये मोदी सुशासन कार्यकालाचे नऊ वर्षे  पूर्ण झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहे त्याबाबत जामनेर शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत घरोघरी जाऊन पत्रक वाटप करण्यात आले.

 

यावेळी अशोक कांडेलकर नंदू महाजन भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र बाविस्कर, नवल राजपूत, राजमल भागवत, रमेश नाईक यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात भाजपातर्फे घरोघरी जाऊन मोदी शासनाच्या नववर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामाची पत्रके वाटप करण्यात आली. त्याचबरोबर विकास कामाची माहिती देण्यात आली.  यावेळी  राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घरोघरी जाऊन विविध कुटुंबात मध्ये विकास कामाची माहिती देऊन ठिकठिकाणी कुटुंबासोबत चर्चा केली.

Protected Content